जैतापूरमध्ये भूकंपाचा धोका-अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञाचे वक्तव्य

Add a comment
Press release - January 12, 2012
मुंबई,जानेवारी १२,२०१२:कोलरॅडो विद्यापिठातील प्राध्यापक रॉजर बिल्हाम आणि इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ़ ऍस्ट्रोफ़िजिक्समधील प्राध्यापक विनोद गआर यांनी संयुक्तरित्या लिहिलेल्या एका प्रबंधानुसार जैतापूरमध्ये रिश्टर स्केलवर ६ पेक्षा जास्त तीव्रता असणारा भुकंप होण्याची शक्यता आहे.हा प्रबंध करंट सायंस असोसिएशन आणि इ��डियन अकॅडमी ऑफ़ सायंसेस यांनी प्रकाशित केलेल्या ‘करंट सायंस’ या नामांकित भारतीय नियतकालिका मध्ये प्रकाशित झाला होता.

ग्रीनपीस या पर्यावरणविषयक संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात श्रोत्यांना माहिती देताना प्राध्यापक बिल्हाम म्हणाले, "मागच्या पाच दशकामध्ये लातूर येथे Mw=6.3आणि कोयना येथे Mw=6.4 तीव्रतेचे भुकंप होण्यास जो भुशास्त्रीय दाबपट्टा कारणीभूत होत्या त्याच कालखंडाच्या पट्ट्यात जैतापूरदेखील येते.त्यामुळे या ऊर्जाप्रकल्पाच्या थेट खाली तेवढ्याच तीव्रतेचा भुकंप होवू शकतो असा तर्क करण्यात आला आहे.हा भूकंप होण्याची संभाव्यता अतिशय कमी आहे ,परंतू तशी शक्यता नाकारता येत नाही आणि सुरक्षित ऊर्जा प्रकाल्पाच्या रचनेमध्ये तो एक महत्वाचा मुद्दा आहे."

ते पुढे म्हणाले की, "जैतापूरमध्ये जास्त तीव्रतेचा भूकंप होणार नाही असे ठामपणे/आत्मविश्वासाने सांगणे शक्य नाही कारण तसे करण्यासाठी अनेक शतकापासूनच्या विश्वसनीय माहितीचा अभ्यास करावा लागेल.कारण दोन भुकांपामध्ये बऱ्याच काळाचे अंतर असते.आणि जैतापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर,केवळ मागच्या २०० वर्षापर्यंतचीच विश्वसनिय माहिती उपलब्ध आहे, आणि एखाद्या प्रदेशाच्या भूगर्भीय इतिहासात २०० वर्ष इतका कालावधी फ़ारच थोडा आहे.

जैतापूरचा भाग रत्नागिरी जिल्ह्यात येतो आणि रत्नागिरी जिल्हा ४ क्रमांकाच्या सेस्मिक झोन प्रकारामध्ये आहे (अधिक नुकसान).५क्रमांकाच्या सेस्मिक झोनमध्ये सर्वाधिक नुकसान होते(२).या भागाने १९८५ ते २००५ या कालावधीत एकूण९२ भूकंप अनुभवले आहेत(३)."

प्रदीप इंदुळकर यांच्या मते, "NEERIने तयार केलेल्या पर्यावरणीय प्रभावाच्या मापनामध्ये(एन्वायरमेंट इंपॅक्ट असेसमेंट EIA) या भागाचा समावेश ३ क्रमांच्या झोनमध्ये होत असल्याचा दावा चुकीचा आहे,वास्तविक पाहता तसे नसून याउलट तो ४ क्रमांकाचा झोन आहे.४ क्रमांकाच्या सेस्मिक झोनला ३ क्रमांकाचा समजून त्या भागात ३ क्रमांकाच्या सेस्मिक झोनच्या निकषानुसार ऊर्जा प्रकल्प बांधणे केवळ त्या प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अत्यंत घातक/विनाशकारी आहे. हा एकप्रकारे घडण्याच्या प्रतिक्षेत असलेला विनाशच आहे."

जनहित सेवा समितीचे प्रविण गवाणकर,मदबन आणि डॉ.मिलिंद देसाई,मदबन यांनी या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणीय निकष पूर्तता परवानगी(एन्वायरमेंटल क्लियरन्स) रद्द करावी अशी याचिका राष्ट्रिय हरित लवादाकडे(नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) केली आहे.

समाप्त--

संपादकासाठी टिपा--

भारतातील जैतापूर परिसरातील ऐतिहासिक आणि भविष्यातील भूकंपशीलता(हिस्टॉरिकल आणि फ़्युचर सेस्मिसिटी नीअर जैतापूर)-बाय रॉजर बिल्हान आणि विनोद गआर.
http://www.greenpeace.org/india/Global/india/Historical%20and%20future%20seismicity%20near%20Jaitapur,%20India.pdf

राष्ट्रिया आपत्ति व्यवस्थापन मंडळ,भारत सरकार:रत्नागिरी भूकंप झोन क्र.४
http://ndma.gov.in/ndma/eqmeasurement.html

२०वर्षातील ९२ भूकंप (टाईम्स ऑफ़ इंडियामधील रिपोर्ट)
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-03-16/india/28699015_1_jaitapur-nuclear-power-plant-earthquake

परिचय:

रॉजर बिल्हाम:

कोलोरॅडो विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक.त्यांनी भारतीय उपखंडाच्या भूकंपशीलतेचा/भूकंपप्रवणतेचा सखोल अभ्यास केला आहे.त्यांनी भूकंप आणि भूकंप/भूकंपप्रवणता याविषयी संयुक्तपणे जवळपास ६०प्रबंध लिहिले आहेत.

http://www.colorado.edu/GeolSci/faculty/bilham.html

विनोद गआर:

बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ ऍस्ट्रोफ़िजिक्स येथील नामांकित प्राध्यापक.तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स,एज्युकेशन ऍंड रिसर्च(IISER)/भारतीय विज्ञान,शिक्षण आणि संशोधन संस्था कोलकाता येथील ऍडजंक्ट प्राध्यापक.त्यांनी बनारस विद्यापीठ आणि इंपिरियल कॉलेज येथे जिओफ़िजिक्सचा अभ्यास केला आणि जिओ- ईलेक्ट्रोमॅग्नेटिक्समधील आतापर्यंत कसालीही शंका नसणाऱ्या 'होस्ट रॉक इफ़ेक्टचा' शोध लावला.त्यांच्या या शोधासाठी त्यांना १९५९ मध्ये युनिवरसिटी ऑफ़ लंडन यांच्याकडून डॉक्टरेटची पदवी बहाल करण्यात आली.यानंतर लागलीच त्यांच्या अभासविषयक कामाची सुरुवात यु.के.मधील नॅशनल फ़िजिकल लॅबोरेटरी येथी झाली

http://www.ngri.org.in/htmlfiles/aboutngri/previousdirectors/previousdirector.html

प्रदीप इंदूळकर:

प्रदीप यांनी १९८३ते १९९४पर्यंत भाभा अणूसंशोधन केंद्रात का केले आहे.त्यांनी वैज्ञानिक अधिकारी असताना पदाहून राजीनामा दिला आणि आता पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.पर्यावरण शिक्षण केंद्र,निसर्ग स्पष्टिकरण केंद्र यांची रचना करण्यात ते कुशल आहे.ते अणूप्रकल्प विरोधी कार्यकर्ते आहेत आणि मागच्या २ वर्षांपासून जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प विरोधी जन आंदोलनात काम करत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

करून रैना,न्युक्लिअर कॅंपेनर,ग्रीनपीस इंडिया.+ +91 9650111955,

होझेफ़ा मर्चंट,मेडिया ऑफ़िसर,ग्रीनपीस इंडिया.+91 9819592410,