प्रदूषण मुक्त वातावरणाची मुंबईकरांची मागणी

Press release - March 20, 2018
मुंबई, 20 मार्च 2018, मुंबई प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने सात गिर्यारोहकांनी प्रदूषणमुक्त मुंबईचा फलकासहीत वाशी ब्रिजची चढाई केली. वाशी ब्रिजवरील लावलेल्या या फलकांवर प्रदूषण मुक्त खंड असे म्हटले आहे. दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असलेल्या वाशी ब्रिजवरील हे फलक वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा वातावरणावर होणाऱ्या परिणामाचे प्रतिक आहेत.

स्वच्छ वातावरण, स्वच्छ हवेचा आग्रह करत या  उत्साही गिर्यारोहकांनी वाशी ब्रिजची चढाई केली.  त्याचवेळी दिल्लीत सुद्धा विविध सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या  सात पर्यावरण रक्षक कार्यकर्त्यांनी बदरपूर पावर प्लांटजवळ निषेध नोंदवला. याआधी कित्येकवेळा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ब��रपूर प्लांट बंद करण्यात आला. दोन्ही शहरातील हा निषेध पाहता नागरिक वायुप्रदूषणाविरोधात एकजूट होताना दिसत आहेत.
हा निषेध पर्यावरण मंत्रालयाला आपल्या देशात सध्या तात्काळ राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेवर अंमलबजावणी करणे  गरजेचे असल्याची आठवण व्हावी, यासाठी करण्यात आला. स्वच्छ हवा योजनेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उत्सर्जनात जवळपास 35% घट होऊ शकते. देशातील महत्त्वाचे शहर दिल्ली आणि मुंबई या दोन्हींमध्ये कोळसा आणि पेट्रोल हे वायु प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत.

 देवेन आर्य, कार्यकर्ते  म्हणाले की“वायु प्रदूषणाचे परिणाम आणि त्यापासून होणाऱ्या नुकसानविषयी वाचल्यावर मी या स्वच्छ हवेसाठीच्या मोहीमेत सहभागी घेतला. मी दिल्लीतील वायु प्रदूषणाच्या स्थितीबाबत वाचले आहे, मात्र यंदा आम्ही मुंबईत सुद्धा धुडकाप पाहिला. मी रोज मास्क लावून ऑफिसमध्ये जाण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. राज्य सरकारने लवकरच वायु प्रदूषणाविरोधात ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”, असे मोहिमेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीने म्हटले.
ग्रीनपीस इंडिया एअरकलिपस दोनच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील पाच वर्षाच्या वयोगटातील 6.7 दशलक्ष बालके राष्ट्रीय परिवेश वायु गुणवत्ता मानदंड ओलांडणाऱ्या जिल्ह्यांत तर 2.6 दशलक्ष नागरिक वायु गुणवत्ता अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रात राहतात.
ग्रीनपीस इंडियाचे प्रचारक अक्षय गुप्ता म्हणाले की, महाराष्ट्रातील वायु प्रदूषणाची स्थिती बिघडत चालली आहे. राज्यातील फक्त 16% नागरिक वायु प्रदूषणाचा अभाव कमी असलेल्या क्षेत्रात राहतात. आणि हा आकडा आपल्याला वायु प्रदूषण कमी करण्यासाठीच्या योजना बाजूला ठेवत राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दर्शवतो.

महाराष्ट्रातील 24 शहरांपैकी एकही शहर सीपीएसीबीने निर्धारित केलेल्या वार्षिक पीएम 10 वायू गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाही, ही परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबई दुसरी दिल्ली होण्याआधी याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वात अधिक वायू प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये आपले नाव नोंदवण्यापेक्षा मुंबईने सर्वात कमी वायू प्रदूषण असलेल्या यादीत नाव नोंदवावे. जिथे स्वच्छ हवा, वातावरण आणि आरोग्य यांना प्राधान्य दिले जाते. मुंबईकरांनी एकजूट होऊन सर्व क्षेत्रात राष्ट्रीय स्वच्छ हवा योजना राबविण्याची मागणी करणे आवश्यक आहे, असेही अक्षय यांनी म्हटले.
Link to photographs: (Delhi & Mumbai) http://media.greenpeace.org/collection/27MZIFJXMY6VY

For further details:
Jitendra Kumar, Senior Media Specialist,
9868167337,

Madhulika Verma, Senior Media Specialist,
9971137736,

Akshay Gupta, Campaigner;
+91 9650930777;